आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत - मुख्यमंत्री
आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तसेच सौम्य गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना यावेळी दिले आहेत. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या सरकारने आरक्षण मंजुर केलं पण न्यायालयात आरक्षण अडल्याचा पुनर्रोच्चारही त्यांनी यावेळी केला. न्यायालयात कायदा टीकावा हिच भूमिका असू मराठा आरक्षणाचा प्रश्न विधिमंडळात सोडवायचा असल्याचेही ते म्हणाले.
अहवाल लवकर द्यावा
मेगाभरतीबद्दल मराठा आणि इतर समाजामध्ये अनेक संभ्रम पसरवले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. घाईने मेगाभरती होणार नसल्याचे सांगत याबद्दल संभ्रम बाळगू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागासवर्ग आयोगाने अहवाल लवकरात लवकर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रिपोर्टर
Aajchi Navi Mumbai
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai