Breaking News
11 जणांना जन्मठेप ; 14 वर्षांनी लागला निकाल
अहमदाबाद : अहमदाबाद इथल्या विशेष न्यायालयाने 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद 70 मिनिटांत तब्बल 21 बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 2002 च्या गुजरात दंगलीचा (गोध्रा हत्याकांड) बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांनी हे हल्ले केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. गुजरातच्या सर्वात मोठ्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी 28 जणांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तब्बल 14 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे. न्यायालयाने या प्रकरणात 49 जणांना दोषी ठरवले होते तर इतर 28 आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. 13 वर्षांहून अधिक जुन्या खटल्यात न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये खटल्याची कार्यवाही पूर्ण केली होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai