खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


जुन्याच कामांचा नवा अर्थसंकल्प

पालिकेचा 4 हजार 910 कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी सादर केला आहे. 4 हजार 910 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून 4 हजार 908 कोटी खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांवर भर देण्यात आल्याचे दिसते. सलग 21 व्या वर्षी अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची कर वाढ करण्यात आली नसल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पुढील वर्षी मनपाचे उत्पन्न वाढणार असल्याचा दावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे. 

आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासाठी विशेष भर देण्यात आला आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवहार व जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनाही दिलासा देण्यासाठी तसेच आर्थिक दुर्बल घटकांच्या आर्थिक प्रगतीसाठी अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.  मात्र यात कोणत्याही नवीन प्रकल्पांचा समावेश नसून आहेत तेच प्रकल्प पुर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. ‘लिडार’ सर्वेक्षणातून मालमत्तांचे मूल्यांकन करून त्याद्वारे योग्य मालमत्ता करआकारणीतून उत्पन्न वाढण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. मात्र, यातून दोनशे कोटी जमा होण्याचा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला आहे. शहरातील पुनर्वसन प्रकल्प एका वर्षांत पाच पट कमाई करुन देणार असल्याचा अंदाजही मांडण्यात आला आहे. महापालिकेने एकूण उत्पन्नामध्ये स्वतःचे उत्पन्न स्रोत हे साधारणतः 89 टक्के आहेत. शहरात सातत्याने महसुली उत्पन्नात वाढ होत आहे. ही महापालिकेच्या दृष्टीने जमेची बाजू असून 8.88 टक्के दराने महापालिकेचे उत्पन्न वाढत आहे; तर 7. 78 टक्के दराने खर्च वाढला आहे. महसुली खर्च पुढील 5 वर्षांत प्रत्येक वर्षी 2 टक्के याप्रमाणे 5 वर्षांत 10 टक्के कमी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे.

एकूण उत्पन्नाच्या तुलनेत महसुली खर्च

2016-17 - 34 टक्के, 2017-18 - 29 टक्के, 2018-19-29 टक्के, 2019-20 - 28 टक्के आणि 2020-21 - 30 टक्के

आगामी प्रकल्प

- घणसोली ते ऐरोली उर्वरित पामबीच रस्ता व पूल बांधणे.
- ऐरोली काटईनाका उन्नत मार्गावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर ऐरोली येथे चढउतारासाठी मार्गिका देणे.
- वाशीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाशी ते कोपरी उड्डाणपूल तयार करणे.
- तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर बायोगॅस, बायोसीएनजी प्रकल्प उभारणे.
- मोरबे धरणावर 100 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प.
- शहरात सुमारे दीड हजारपेक्षा जास्त सीसी टीव्हीचे जाळे.
- नवी मुंबई शहरातील सर्व मालमत्तांचा लिडार पद्धतीने सर्वे करणे.

...........................................................

विशेष

  • झोपडपट्ट्यांना मिळणार नळजोडणी
    झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक नळांवर होणारी रोजची भांडणे आता थांबणार आहेत. झोपडपट्टीत राहाणार्‍या प्रत्येकाला वैयक्तिक नळजोडणी मिळणार आहे. त्यासाठी छाननी शुल्क व रस्ता खोदाई शुल्क घेतले जाणार नसून अवघे 100 रुपये इतकी सुरक्षा अनामत रक्कम घेतली जाणार आहे.
  • विद्यार्थ्यांसाठी इस्रोची सहल
    नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना भारतीय वैज्ञानिक संस्थेची सैर करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) या ठिकाणी शैक्षणिक सहल आयोजित केली जाणार आहे.
  • विष्णुदास भावेमध्ये ग्रंथालय
    महापालिकेने वाचन संस्कृती अधिक रुजावी आणि वाढावी यादृष्टीने भर दिला आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात एक सुसज्ज असे ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी नाटक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणार्‍या प्रेक्षकांना कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मोकळ्या वेळेत पुस्तके वाचण्यास उपलब्ध केली जाणार आहेत.
  • तृतीयपंथींसाठी योजना
    तृतीयपंथी व्यक्तींकरीता स्वतंत्र शौचालय उभारणे, त्यांना स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण देणे व अर्थसहाय्य देणे, 
  • विशेष घटकांसाठी योजना
    आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना स्वयंरोजगारासाठी उपकरणे व साहित्य खरेदीकरीता अर्थसहाय्य करणे, 60 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या निराधार महिलांना उदरनिर्वाह भत्ता देणे, रेड लाईट एरियातील ज्या महिला या व्यवसायातून बाहेर पडू इच्छितात त्यांना स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण देणे, एचआयव्ही बाधित पालकांच्या 18 वर्षाआलि बालकांच्या संगोपनासाठी अर्थसहाय्य करणे
  • .दिव्यांगासाठी योजना 
    दिव्यांग विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंरोजगाराकरिता संधी उपलब्ध करण्यासाठी स्टॉल उभारण्याचे नियोजन, महिलांसाठी आवश्यक साहित्य खरेदीकरीता अर्थसहाय्य व प्रशिक्षण देणे, जन्मतः दिव्यांग असलेल्या बालिकेच्या नावे 50 हजारांचा विमा काढणार
पर्यावरणावर भर
माझी वसुंधराअंतर्गत मियावाकी स्वरुपाची दाट जंगलनिर्मिती,पाणथळ जागांचे संवर्धन, खारफुटीचे पुनर्रोपण, शहरात व्हर्टिकल गार्डन, ग्रीन गार्डन उभारणी, सोलार ट्रीज आणि जनजागृती उपक्रम, सायकल व ई-बाईकला प्रोत्साहन, युलू सायकल प्रकल्पावर भर, बायो-मिथेनायझेशन प्रकल्पाचे नियोजन, हरित कचर्‍यापासून बायोकोल निर्मिती


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट