अमिषा ठाकूर हिने पटकावला ‘मिस नवी मुंबई’ चा मुकूट
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 01, 2022
- 728
नवी मुंबई ः ‘मिस नवी मुंबई’ च्या अकराव्या पर्वाचा अंतिम सोहळा शनिवारी वाशी येथील फोर पॉईंट हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या स्पर्धेत 16 सौंर्द्यंवतींची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. सर्व स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकून स्पर्धेची उत्कंठा वाढवली होती. अखेर मिस नवी मुंबई 2022 चा मुकूट अमिषा ठाकूर या सौंदर्यवतीने पटकावला. दुसर्या व तिसर्या जागेवर अनुक्रमे श्रुती राऊल व चहात सिंग हिने बाजी मारली.
‘मिस नवी मुंबई’ ही स्पर्धा गेली 10 वर्षापासून अखंडपणे सुरु असून यंदा याचे अकरावे पर्व होते. यावर्षी प्राथमिक फेरीत 400 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून सर्वच फेरीमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या 16 सौंर्द्यवतींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेची तिसर्या फेरीचे लाईव्ह बँडच्या गायनावर सादरीकरण झाले. सोळा सौंदर्यवतींनी आपल्या दिलखेच अदांनी परीक्षक व प्रेक्षकांना मोहून टाकले. वेगवेगळ्या तीन फेर्या स्पर्धेची उत्कंटा वाढवत होती शेवटी मिस नवी मुंबई 2022 चा मुकूट अमिषा ठाकूर या सौंदर्यवतीने पटकावला. दुसर्या व तिसर्या जागेवर अनुक्रमे श्रुती राऊल व चहात सिंग हिने बाजी मारली. सोबतच परीक्षक म्हणून फेमिना मिस ग्रँड इंडिया 2019 ची विजेती व अभिनेत्री शिवानी जाधव, अभिनेत्री आणि निर्माती रोहिनी कपूर, डॉ.अमित कारखानीस, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
या स्पर्धेत मिस ग्लोइंग स्किन अमिषा ठाकूर, मिस उत्कृष्ट नयन अमिषा ठाकूर, मिस उत्कृष्ट बुद्धिमत्ता श्रुतिका राठोड, मिस मिस स्वभाव साधर्म्य अमिषा ठाकूर, मिस इंटरनेट पॉप्युलर मुस्कान बत्रा, मिस स्टाईल आयकॉन सानिका दिवेकर, गर्ल ऑफ दि शो शताक्षी किरण, उत्कृष्ट रॅम्प वॉल्क चाहत सिंग, बॉडी ब्युटीफुल श्रुती राऊळ, मिस फोटोजेनिक रक्षा पंजाबी, उत्कृष्ट हास्य श्रुती राऊळ, फ्रेश फेस खुशी अजवानी यांनी बक्षिसे पटकाविली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai