खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


..नाहीतर जुन्या शाळेतच वर्ग भरवू

 पनवेल ः सिडकोने प्रकल्पग्रस्त पाच गावांसाठी एक शाळा बांधून दिली आहे. शाळा सुरू होऊन दीड महिना पूर्ण होऊनही शाळेत अजून मूलभूत सोयीसुविधा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुविधा द्या, अन्यथा पाचही शाळा आम्ही पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतरीत करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम प्रगतिपथावर आहे. विमानतळात बाधित होणार्‍या 10 पैकी 5 जिल्हा परिषदेच्या शाळा करंजाडेतील आर 2 येथे स्थलांतरीत केल्या आहेत. सिडकोने या पाच शाळांसाठी 3 हजार चौरस मीटरची तीन मजल्याची इमारत बांधून दिली. जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरित करा, तुम्हाला सर्व शाळा बांधून देऊ, असे आश्वासन शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले. त्यामुळे कोली, कोपर, वरचे ओवळे, वाघीवली वाडा आणि चिंचपाडा येथील पाच शाळा करंजाडे येथील नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आल्या. सिडकोने थाटामाटात 15 जून रोजी उद्घाटन केलेल्या या शाळेत पंधरा दिवस फळाही नव्हता. सिडकोकडे अनेक वेळा मागणी करूनही फळा न मिळाल्यामुळे स्थानिकांनी जुन्या शाळांमधील फळे या शाळेत नेले. पाच शाळांचे मिळून 556 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. नव्या इमारतीत सिडकोने केवळ 5 बस दिल्या. मात्र त्या विद्यार्थ्यांना अपुर्‍या पडत आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक, सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे गणवेश अशा सुविधा मान्य करूनही आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. शाळेत सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही सिडकोने या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली. नव्या शाळेत स्थलांतर केले तरी सिडको जोपर्यंत शाळेला भूखंड घोषित करत नाही, तोपर्यंत जुनी शाळा पाडण्यास विरोध केला आहे. सिडको नव्या शाळेला सोयीसुविधा पुरवित नाही, तोपर्यंत आम्ही पुन्हा जुन्या शाळेतच शाळा भरवू, असा ठराव एकमुखाने ग्रामस्थांनी केला. येत्या दोन दिवसांत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन या मागण्या मांडल्या जाणार आहेत. याच बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास दुसर्‍याच दिवशी शाळा जुन्या ठिकाणी भरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट