उरणसाठी विकास निधी मंजूर

महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश 

पनवेल : उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उरण नगरपालिका व करंजा जेट्टीकरिता विकास निधी मंजूर केला आहे. 

जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी उरण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष असताना नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे उरण नगरपरिषद व करंजा जेट्टीच्या विकासाकरिता निधीची मागणी केली होती,  महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून  सागरमाला अंतर्गत करंजा जेट्टीकरिता 47 कोटी रुपये तर उरण नगरपरिषदेला 05 कोटी रुपये विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उरणमध्ये अधिक िविकासकामाला चालना मिळाली आहे. उरणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या कामांना नामदार सुधीरभाऊंनी निधी मंजूर केला असून तसे मंजुरीपत्रही दिले आहे. त्याबद्दल जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपचे शहर अध्यक्ष कौशिक शहा, यांच्यासह उपनगराध्य जयविंद्र कोळी, नगरसेवक राजू ठाकूर, आशा शेलार, यास्मिन गॅस, जान्हवी पंडित यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.