खाद्यतेलाचे दर भडकले
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 28, 2022
- 550
नवी मुंबई : मागील 2 महिन्यांपासून युक्रेन-रशिया युद्धामुळे तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाढत्या इंधन दरवाढीने ही वाहतुकीचा खर्च वाढल्याने खाद्यतेलात 25 ते 30% दरवाढ झाली आहे. मागील आठवड्यात 15 लीटर सूर्यफूल तेल 2800-2900 वरून 3 हजारांवर पोचले आहे. तर इंडोनेशियाने देखील तेलाची निर्यात थांबवल्याने आगामी काळात भारतात तेलाचा आणखी भडका उडणार असल्याची शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली.
मागील दीड वर्षापासून आवाक्यात असणारे खाद्य तेलाचे दर साधारणतः दिवाळी आधी कडाडले होते. त्यानंतर तेलाचे दर आवाक्यात आले होते. मात्र पुन्हा रशिया युक्रेन युद्धाने तेलाच्या आयातीवर परिणाम झाला. त्यामुळे तेलांच्या दराने उसळी घेतली आहे. मात्र त्यादरम्यान आतापर्यंत खाद्य तेलाचे दर वाढतच आहेत. देशात सूर्यफूल तेलाला अधिक मागणी आहे. बाजारात 50 गाडी आवक होते, मागणी ही आहे परंतु इंधन दरवाढीने ही दरवाढ होत आहे. पाम तेलाचाही खप अधिक आहे. युद्धा आधी सूर्यफूल तेल 15 लिटर 2300रु ते 2400 रुपयांवरून मागील आठवड्यात 2800रु ते 2900रु आता 3 हजार रुपयांवर पोचले आहे. पाम तेल आधी 1200 ते 1400 रुपयांवरून मागील आठवड्यात 2300 ते 2400 रुपये तर आता 2500 रुपयांवर पोचले आहेत. तर आता इंडोनेशिया या देशाने देखिल कच्या तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात तेलाची आवक घटणार असल्याने तेलाच्या मागणीत वाढ होऊन दरात आणखी भडका उडणार असल्याची शक्यता घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai