इथे होणार मुकेश अंबानीच्या मुलाचं लग्न?

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाचा काही दिवसापूर्वीच साखरपुडा पार पडला. आकाश अंबानीचं लग्न त्याची वर्गमैत्रिण श्लोका मेहतासोबत ठरलं. या दोघांचा साखरपुडा अगदी शाही पद्धतीने पार पडला आता यांच लग्न लवकरच होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या होण्यार्‍या सुनेने एक इच्छा व्यक्त केली आहे. श्लोकाला डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. 

यासाठी काही दिवसांपूर्वी रिलायन्स ग्रुपचे चार सदस्य त्रियुगीनारायण मंदिरात पोहोचली होती. ज्यांनी मंदिराचं लोकेशन आणि गढवाल मंडळ विकास निगम येथील बंगल्याचे निरिक्षण देखील केले आहे. यानंतर अशी चर्चा आहे की मुकेश अंबानीच्या मुलाचे आकाश अंबानीचे लग्न इथे होणार आहे. असं म्हटलं जातं की, त्रियुगीनारायणचे महत्व लक्षात घेऊन श्लोकाने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच श्लोकाचे वडिल उद्योगपति रसेल मेहता यांचे पार्टनर अनिरूद्ध देशपांडे यांनी देखील तिला त्रियुगीनारायण येथे लग्न करण्याचा सल्ला दिला होता. या मंदिरात केवळ जयमाला यांच्या विधी आणि सार्वजनिक भोजनाचे आयोजन केले जाते.