14 ऑगस्टला कोकण विभागीय पेन्शन अदालत

नवी मुंबई : कोकण विभागीय पेन्शन अदालत 14 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी-बेलापूर येथे आयोजित केली आहे. 

सदर पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील व जिल्हा परिषदेशी संबंधित असलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रकरणाच्या अडचणीचे निवारण करण्यात येते. सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज  स्वीकारले जातील,असे उप आयुक्त, (सामान्य प्रशासन) कोकण विभाग यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.