रमेश पाटील यांची मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी निवड
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2023
- 1011
उरण ः शरीर सौष्ठव स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या उरण तालुक्यातील दिघोडे गावचे सुपुत्र रमेश पाटील यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत अनेक गोल्ड मेडल पटकाविली आहेत त्यांना उत्कृष्ट कामगिरी मूळे महाराष्ट्र श्री गोल्ड मेडल,द्रोणागिरी श्री टायटल चैम्पियन ऑफ चॅम्पियन, वेलर क्लासिक क्रमांक 5 असे अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आता त्यांची निवड मिस्टर इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.
रमेश पाटील हे स्टॉम फिटनेस कोप्रोली येथे व्यायामाचे, फिटनेसचे ट्रेनिंग घेत आहेत. रमेश पाटील यांना आर्यन पाटील,आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर तथा कोच सिद्धेश शिंदे,निशिकांत घरत, अशीष पाटील,अनिकेत पाटील यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असते.रमेश पाटील यांना घडविण्यासाठी तसेच स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय कोच सिद्धेश शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली आहे.रमेश पाटील यांची निवड मि.इंडियांच्या शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी झाल्याने जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai