Breaking News
उरण : राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेल्याने उरणच्या वायू विद्युत केंद्रातील महाजनकोच्या वीज निर्मितीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उरणमधील वायू विद्युत केंद्रातील 50 मेगावॅटचा सयंत्र बंद झाला आहे. परिणामी वायू विद्युत केंद्रातील 210 मेगावॅट वीज निर्मिती 160 वर आली आहे.
उरणच्या वायू विद्युत केंद्रात 267 कामगार कार्यरत आहेत. या संपात 30 कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र विद्युत कर्मचारी व अभियंता संघर्ष समिती आहे. वायु विद्युत केंद्रातील शंभर टक्के कामगार,अभियंते संपात सहभागी असून संपामुळे वायू विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे, 50 मेगावॅट संच बंद झाला आहे. वीज निर्मिती सुरळीत ठेवण्यासाठी टाटा पॉवरचे तंत्रज्ञ बोलविण्यात आले असल्याची माहिती वायू विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली. बुधवारी सकाळी 5 वाजल्यापासून उरण शहर, केगाव आदी परिसरातील वीज गेल्याने येथील नागरिकांवर संपाचा परिणाम झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai