सिडको गृहनिर्माण संस्था भूखंडांसाठी लवकरच सोडत

नवी मुंबई ः सिडको महामंडळातर्फे सप्टेंबर-2017 मध्ये योजना क्र. एमएम-1/03/सीएचएस/2017-18 अंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडसमध्ये प्रस्तावित गृहनिर्माण संस्थांकरिता भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या बाबतची जाहिरातही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीस देण्यात आली होती. 

सदर योजनेअंतर्गत नवी मुंबईतील पनवेल, नेरूळ, खारघर, कळंबोली, सानपाडा, घणसोली या नोडमधील एकूण 20 भूखंड प्रस्तावित गृहनिर्माण संस्थांकरिता निवासी वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिक, राज्य शासन कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, अनुसूचित जाती व जमाती, पत्रकार, लोकप्रतिनिधी इ. प्रवर्गांतर्गत काही भूखंड राखीव ठेवण्यात आले होते. या योजने अंतर्गत  सिडकोला एकूण 170 प्रस्तावित गृहनिर्माण संस्थांचे अर्ज प्राप्त झाले.  अर्ज तपासणी प्रक्रियेनंतर त्यांपैकी 146 संस्था पात्र ठरून उर्वरीत 24 संस्था या अपात्र ठरल्या. सदर योजनेच्या सोडतीकरिता पात्र व अपात्र (अपात्र ठरण्याचा कारणांसहित) ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांची यादी ुुु.लळवलेारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांकरिता काढण्यात येणार्‍या सोडतीचे ठिकाण व दिनांक लवकरच कळविण्यात येईल. अपात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांना त्यांनी भरलेल्या अनामत रकमेचा परतावा रायगड भवन  येथील लेखा विभागातून कामकाजाच्या दिवसांत दुपारी 02.00 ते सायं. 05.00 या वेळेत घेता येईल. पात्र ठरलेल्या गृहनिर्माण संस्थांचे केवळ मुख्य प्रवर्तक किंवा त्यांचे प्रतिनिधी सोडतीस उपस्थित राहू/सहभागी होऊ शकतील, असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.