Breaking News
मुंबई ः डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी बीकेसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्त 40 हजार कोटींच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आले.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत आहे. ते म्हणाले, डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा, तीच स्वच्छता आणि त्याच विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे, जो कधी फक्त साधन संपन्न लोकांना मिळत होता. यासाठी आज रेल्वे स्थानकांनाही विमानतळासारखं विकसित केलं जात आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील पुनर्विकास केला जात आहेत. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. तसेच मुंबईला भविष्यासाठी तयार करणं, ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे, असं देखील ते म्हणाले आहेत.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ”देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा आज भारत मोठी स्वप्न पाहत असून ती पूर्ण करण्याची हिम्मत करत आहे. याआधी आपल्याकडे एक मोठा काळ फक्त गरीबीची चर्चा करणं, जगाकडून मदत मागणं, यावर वेळ घालवत गेला आहे. ते म्हणाले, ”स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिल्यांदा होत आहे, ज्यात जगाला भारताच्या संकल्पेनेवर विश्वास होत आहे.” ते म्हणाले, ”आज सगळ्यांना असं वाटत आहे की, भारत ते करत आहे जे गतिशील विकासासाठी आवश्यक आहे.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai