Breaking News
उरण ः छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे 26 ते 28 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनीयर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ, संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी जाहीर केला आहे.या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू 3 ते 5 फेब्रुवारी 2023 रोजी स्वर्णभारती इंडोर स्टेडीयम विशाखापटनम आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या सर्व खेळाडूंचा मागील 40 दिवस रोज 8 ते 10 तास सराव सुरु असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी दिली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News
Aajchi Navi Mumbai