Breaking News
10 महिन्यात 18.48 कोटींची 5,670 वीजचोरींची प्रकरणे उघडकीस
नवी मुंबई ः भांडूप परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्न करून वीजबिल वसुलीवर भर देत आहेत. याशिवाय, वीज जोडणी तपासणी, 0-30 रीडिंग नोंदवत असलेल्या मीटरची तपासणी असे विविध उपक्रम सतत सुरु असतात. या तपासणीमध्ये भांडूप परिमंडलात 1 एप्रिल 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 व कलम 135 तसेच आकडा टाकून असे एकूण 18 कोटी 48 लाखाची वीजचोरीची 5670 प्रकरणे उघडकीस आली आहेत.
भांडूप परिमंडलात 1 एप्रिल 2022 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार भांडूप परिमंडलात 50,19,942 युनिटची 9 कोटी 88 लाखाची वीजचोरी उघडकीस आली आहे. यामध्ये ठाणे मंडल कार्यालया अंतर्गत 654 प्रकरणात 3 कोटी 24 लाख, वाशी मंडल कार्यालयात 1,075 प्रकरणात 4 कोटी 57 लाख व पेण मंडल कार्यालयात 686 प्रकरणात 2 कोटी 06 लाखाची वीजचोरी पकडली आहे. याशिवाय, विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार ठाणे मंडल कार्यालयात 1701 प्रकरणात 4 कोटी 11 लाख, वाशी मंडल कार्यालयात 646 प्रकरणात 2 कोटी 32 लाख तर पेण मंडल कार्यालयात 261 प्रकरणात 73.48 लाख असे एकूण 2608 प्रकरणात 7 कोटी 18 लाखाचा अनधिकृत विजेचा वापर आढळून आला आहे. या शिवाय आकडा टाकून वीजचोरी करण्याचे 647 प्रकरणे समोर आली आहे. या मध्ये 1 कोटी 42 लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. सदर मोहिमेत मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अति.कार्यकारी अभियंता, सहा.अभियंता व लाईनस्टाफ पर्यंत प्रत्येकांनी विशेष मेहनत घेतली आहे.
वीजचोरी रोखणे हे महावितरणपुढे एक मोठे आव्हान आहे. महावितरणने वीज चोरांवर तीव्र कारवाई सुरु केली असून ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे प्रामाणिकपणे भरले पाहिजे. वीजचोरी सारख्या अनधिकृत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनविरुद्ध विद्युत कायदा 2003 प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येत आहे. ग्राहकांनी वीजचोरी सारख्या कृत्यापासून दूर राहावे. -मुख्य अभियंता,सुनील काकडे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai