Breaking News
कोपरखैरणेत महिला सक्षमीकरण केंद्राच्या वास्तूचे उद्घाटन
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्रम राबवून ठोस काम केले जात असून महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध करुन दिले आहे. पालिकेच्या वतीने सेक्टर 10, कोपरखैरणे येथे भूखंड क्र. 9 वर उभारण्यात आलेल्या तीन मजली महिला सक्षमीकरण केंद्र इमारतीच्या उद्घाटन नुकतेच महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 10, कोपरखैरणे येथे रामचंद्र नाईक चौकाशेजारी डी मार्ट जवळ भूखंड क्र. 9 वर मोक्याच्या ठिकाणी 2 कोटी 85 लक्ष रूपये खर्च करून ही तीन मजली महिला सक्षमीकरण वास्तू उभारण्यात आली असून प्रत्येक मजल्यावर 7.5 द 7.5 मीटरची सभागृह व्यवस्था आहे. हे केंद्र लवकरच कार्यान्वित करून याठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, उपयोगी उपक्रम राबविण्यास सुरूवात होईल तसेच महिलांनी निर्मिलेल्या विविध साहित्य विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उद्धाटन प्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी, इ प्रभाग समितीच्या अध्यक्ष लता मढवी, स्थानिक नगरसेवक रामदास पवळे, नगरसेवक लिलाधर नाईक, रमेश डोळे, ड. भारती पाटील, संगीता म्हात्रे, इ प्रभाग समिती सदस्य मारूती सकपाळ, माजी नगरसेवक कोंडीबा तिकोने, रविकांत पाटील, इंदुमती तिकोने, कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त अशोक मढवी, कार्यकारी अभियंता संजय देसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईृ शहराने नेहमीच नावाप्रमाणे नव्या गोष्टींना प्राधान्य दिले असून महिलांचे सक्षमीकरण करताना जागतिक पातळीवरील बदलांचा अंदाज घेऊन त्याला साजेसे प्रशिक्षण कार्यक्रम, योजना, उपक्रम राबवावेत असे सूचित केले. नवी मुंबई महानगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी भरीव काम करीत असून या वास्तूमधून महिलांना सर्वार्थाने सक्षम करणारे नानाविध उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करीत आपण त्यासाठी 15 लक्ष रूपयांचा आमदार निधी देत असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी जाहीर केले. स्थानिक नगरसेवक रामदास पवळे यांनी आपल्या प्रभागात एक चांगली वास्तू उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त करीत महिला भगिनींनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले. या इमारतीचा वापर महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी होणार असून याप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai