खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


शरीरसौष्ठवपटूंमध्ये मुंबईचा रसेल दिब्रेटो सर्वोत्कृष्ट

  • नवी मुंबई पालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा जल्लोषात   
  • ऐरोलीच्या सतीश यादव यांना नमुंमपा क्षेत्र श्रीचा सन्मान

नवी मुंबई ः शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिंय असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आणि नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा कोरोनाच्या मधल्या दोन वर्षाच्या खंडानंतर विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या. राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या 157 शरीरसौष्ठवपटूंमधून मुंबईच्या रसेल दिब्रेटो यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत सव्वालाख बक्षिस रक्कमेसह नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू 2023 किताबासह मानाचा चषक स्विकारला. कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकर यांनी 45 हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.

नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 55,60,65,70,75,80,85 किलोपर्यंत व 85 किलोवरील अशा 8 वजनी गटामध्ये आयोजीत करण्यात आली. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा 50,55,60,65,70 किलोपर्यंत व 70 किलोवरील अशा 6 वजनी गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. या प्रत्येक वजनी गटातील 6 विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री 2023 या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी 69 स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे विजेतेपद 50 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत ऐरोलीच्या सतीश यादव यांनी पटकाविले. वाशीच्या महेद्र शेडगे यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद 25 हजार रक्कमेसह संपादन केले. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या चंद्रशेखर पवार यांनी बेस्ट पोझर तसेच ठाण्याच्या सुदर्शन खेडेकर यांनी मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी रु. 15 हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्ती पत्रासह प्रदान करण्यात आली. 225 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शसीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसगी बोलताना त्यांनी नवी मुंबई शहराने प्रत्येक क्षेत्रात स्वत:चे वेगळेपण सिध्द केले असून क्रीडा क्षेत्रातही अनेक खेळाडू शहराच्या नावलौकिक वाढवित आहेत अशी प्रशंसा करीत नवी मुंबई ही नागरिक केंद्रबिंदू मानणारी महानगरपालिका असल्याने सर्वांच्या एकत्रित सहयोगातून यशोकिर्तीस पात्र झाली असल्याचे सांगितले. पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक, क्रीडा विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, नवी मुंबई महानगरपलिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव ॲड. विक्रम रोटे, ग्रेटर मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे महासचिव नंदकुमार खानविलकर, ठाणे बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव  राजेंद्र चव्हाण, नवी मुंबई बॉडी बिल्डींग असोसिएशनचे सचिव हेमंत खेबडे आदी मान्यवर उपस्थित होते.


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट