अर्थसंकल्पातील जमेच्या बाबी
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2023
- 492
महानगरपालिकेस विविध करांच्या रुपाने उपलब्ध होणाऱ्या निधीमधून नागरी सेवा सुविधांची पूर्तता होत असते. त्यामुळे उत्पन्नाच्या बाबींकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये वस्तू व सेवा (GST) करापोटी शासनाकडून मिळणारे सहाय्यक अनुदान व मुद्रांक शुल्क, इतर शासन अनुदाने नवी मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता कर, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारे शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता उपयोगिता, विविध सेवा व इतर साधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांचा समावेश आहे.
मालमत्ता कर :- माहे नोव्हेंबर 2022 अखेर रू.296.55 कोटी मालमत्ता कराची वसूली करण्यात आलेली असून माहे मार्च-2023 अखेर रू.278.44 कोटी अशी एकूण रु. 575.00 कोटी इतकी वसूली होईल अशी अपेक्षा आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रू.801.00 कोटी जमा होतील असा अंदाज आहे.
स्थानिक संस्था कर :- दि. 01 जुलै 2017 पासून शासनाने स्थानिक संस्था कर रद्द करुन वस्तू व सेवा कर () लागू केल्याने महानगरपालिकेस होणा-या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून सहाय्यक अनुदान प्राप्त होत आहे. सन 2022-2023 या वर्षात शासनाकडून सहाय्यक अनुदान रक्कम रु. 1394.76 कोटी वसूली अपेक्षित आहे. सन 2023-2024 साठी शासनाकडून सहाय्यक अनुदान वसूली रक्कम रु.1506.35 कोटी अपेक्षित राहील. सन 2022-2023 या वर्षात 1% मुद्रांक शुल्क रक्कम रु.50.32 कोटी एवढी वसूली अपेक्षित आहे. सन 2023-2024 साठी मुद्रांक शुल्क वसूली रक्कम रु.60.00 कोटी अपेक्षित राहील.
स्मार्ट पार्किंग पॉलिसी :- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वृध्दींगत व्हावी व शहराचा विकास “वाहनपूरक“ शहर न होता “नागरिकपूरक” व्हावा असा विश्वास निर्माण करणेकरिता सर्वसमावेशक “स्मार्ट पार्किंग पॉलिसी“ तयार करण्याचे व “सर्वसमावेशक वाहनतळांचे नियोजन“ करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
अतिक्रमण विभाग :- सन 2023-24 करिता अतिक्रमणे निष्कासन या मार्फत वसूलीचे उद्दिष्ट रु. 3.00 कोटी इतके प्रस्तावित करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा विभाग :- नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देयकातून वार्षिक रु. 83.17 कोटी इतका महसूल प्राप्त होत आहे.
- कर्जमुक्त महानगरपालिका :- नवी मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 10 % व्याजाने रु. 568.84 कोटी इतक्या रक्कमेचे कर्ज सन 2009 ते सन 2015 या कालावधीत विविध सुविधा कामांसाठी घेतले होते. सदर उर्वरित कर्जाची व्याजासह संपूर्ण रक्कम रु. 90.00 कोटी दिनांक 12/12/2022 रोजी परत केलेली आहे. महानगरपालिकेने कर्जाची परतफेड मुदतपूर्व केलेली असल्याने रु. 12.22 कोटी एवढी बचत झालेली आहे. आता नवी मुंबई महानगरपालिका कर्जमुक्त आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai