सहकारी गृहनिर्माण संस्थांनी माहिती पाठवावी

सिडकोचे आवाहन

नवी मुंबई ः नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थानी आपली तपशीलवार माहिती सिडकोकडे सादर करण्याचे आवाहन सिडकोने केले आहे. 

सिडकोकडे देयक, विविध प्रकारचे शुल्क इ. करीता करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या रकमेचा भरणा हा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने करावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट/शुल्क भरणा सुविधेकरिता महामंडळाचे सर्व कामकाज संगणकीकृत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यास्तव, नवी मुंबई कार्यक्षेत्रातील सर्व गृहनिर्माण संस्थानी आपली इमारत व सदनिकानिहाय भूखंड क्रमांक, सेक्टर क्रमांक, नोड, संस्थेचे नाव, इमारत क्रमांक, विंगचे नाव, मजला क्रमांक, सदनिका क्रमांक, चटई क्षेत्र (चौ.मी.) अशी तपशिलवार माहिती एक्सेल स्वरूपात (एक्सेल फॉर्मेट) यांपैकी संबंधित विभागास ई-मेलद्वारे  ाींी1लळवलेळपवळर.लेा (नवी मुंबईतील महानगरपालिका हद्दीतील सर्व गृहनिर्माण संस्था (12.5% योजना वगळून), ाींी2लळवलेळपवळर.लेा (सर्व 12.5% योजनेतील वाटप गृहनिर्माण संस्था), ाींी3लळवलेळपवळर.लेा (नवी मुंबई महानगरपालिका हद्दीबाहेरील सर्व गृहनिर्माण संस्था (12.5% योजना वगळून)  नवी मुंबईतील कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सदर माहिती सिडकोला लवकरात लवकर सादर करण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.