नवरात्रौत्सवातील मंडप उभारणीकरीता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज मुदत

नवी मुंबई ः 10 ते 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साजर्‍या होणार्‍या नवरात्रौत्सवाकरीता सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी मंडळांनी ई-सेवा संगणक प्रणालीचा उपयोग करावयाचा असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या ुुु.पााल.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील (थशलीळींश), मुख्य पृष्ठावर (केाश झरसश), नागरी सेवा (डर्शीींळलशी) सेक्शनमध्ये, मंडप परवानगी (चरपवरि झशीाळीीळेप) करिता सहजपणे अर्ज दाखल करण्याची सुविधेचा वापर करावयाचा आहे. या ई-सेवा संगणक प्रणालीवर दाखल करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जाव्दारे मंडप परवानगीशी संबंधित विभाग पोलीस, वाहतुक पोलीस, अग्निशमन अशा सर्व प्राधिकरणांचे ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे गणेशोत्सवाप्रमाणेच एकाच अर्जावर उपलब्ध होणार आहेत व यामुळे मंडळांची वेगवेगळ्या प्राधिकरणांच्या कार्यालयांमध्ये जाऊन संपर्क साधण्याची धावपळ कमी होऊन कार्यपध्दतीतही सुलभता येणार आहे. या ऑनलाईन प्रणालीव्दारे मंडळांना आहे त्या ठिकाणाहून अर्ज करता येणे शक्य होणार असून अर्ज भरताना काही अडचणी आल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रातही सायं. 3 ते 5 या वेळेत या मंडळांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य केले जात आहे. ही मंडप परवानगी प्रक्रिया नवी मुंबई महानगरपालिकेने सुरु केली असून मंडळांनी उत्सवाआधी किमान 10 दिवस म्हणजेच 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज ई-सेवा संगणक प्रणालीवर दाखल करावयाचे आहेत. तरी गणेशोत्सवाप्रमाणेच उत्साहात नवरात्रौत्सव साजरा करणार्‍या मंडळांनी या अभिनव प्रणालीचा मंडप परवानगी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा असे आवाहन महापौर जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.