अर्थव- रोहितची रजत भरारी

नवी मुंबई : दि नॉर्थ पॉईट कोपरखैरणे शाळेचे विद्यार्थी अथर्व झरांगे व रोहित काटेदेशमुख यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर रजत पदक जिंकून नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 

नागपुर येथील एनआयटी स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत अथर्व झरांगे याने 50 मीटर बटरफ्लॉय या स्पर्धेत 29.84 ही वेळ देत रजत पदक मिळवत राष्ट्रीय पातळीवर आपली निवड निश्‍चित केली. त्याचवेळी रोहित काटेदेशमुख याने राष्ट्रीय स्तरावर झालेल्या आयसीएसई बोर्ड शाळांच्या झालेल्या स्पर्धेत 100 मीटर बटरफ्लॉयमध्ये 1.07 मि. वेळ देत रजत पदक मिळवले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. ही स्पर्धा गुजरातमधील वलसाड येथे घेण्यात आली.