Breaking News
30 जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
नवी मुंबई ः कर्मचारीहिताचे विविध निर्णय घेताना विविध विभागातील 20 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 30 कर्मचाऱ्यांना 3 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे मे 2021 पासून 2 वर्षात एकूण 651 कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 30 कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली असून यामध्ये 8 उपलेखापाल, 2 श्रवण व वाचा तज्ज्ञ, 1 मानसोपचार तज्ज्ञ, 4 हस्तकला शिक्षक, 1 शारीरिक शिक्षक निदेशक, 1 व्यवसायोपचार तज्ज्ञ, 2 चित्रकला शिक्षक, 2 शिपाई, 4 मुकादम, 5 सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. मे 2021 पासून मागील 2 वर्षांत 621 अधिकारी, कर्मचाऱ्यांना 3 लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला असून आज 30 अधिकारी, कर्मचारी यांना हा लाभ देण्यात आलेला आहे. सहाव्या वेतन आयोगानुसार 12 व 24 व्या वर्षी मिळणारे आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ आता सातव्या वेतन आयोगानुसार 10 व्या, 20 व्या व 30 व्या वर्षी असे 3 लाभांच्या स्वरूपात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार मिळत असून या निकषात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते लवकरात लवकर देण्यात यावेत असे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
पदोन्नतीस पात्र 12 प्रशासकिय अधिकारी आणि 8 स्वच्छता निरीक्षक अशा एकूण 20 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून मे 2021 पासून मागील 2 वर्षात एकूण 346 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. अशाप्रकारे मागील 2 वर्षांच्या कालावधीत आजच्या 30 कर्मचाऱ्यांसह एकूण 651 अधिकारी, कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच आज 20 कर्मचाऱ्यांसह मागील 2 वर्षात एकूण 346 अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai