कोपरातील तात्पुरता पूल जमीनदोस्त
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2023
- 418
नवी मुंबई ः महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरमध्ये आलेल्या श्री सदस्यांना विनाअडथळा प्रवेश तसेच बाहेर पडता यावे, यासाठी कोपरा पुलाच्या शेजारी तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. या पुलामुळे पावसाळ्यात सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण खारघरमधील काही नागरिकांनी पूल तोडण्यास विरोध केल्याने अखेर सिडकोने पोलिसांचा फौजफाटा घेऊन हा पूल जमीनदोस्त केला आहे.
सायन-पनवेल महामार्गावर असलेल्या हिरानंदानी पुलाखालून खारघर वसाहतीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकमेव प्रवेश मार्ग आहे. त्यामुळे ज्येष्ठ निरूपणकर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या श्री सदस्यांची गैरसोय टाळण्यासाठी कोपरा पुलालगत खारघर वसाहतीत प्रवेश करता यावा, यासाठी सिडकोने तात्पुरता पूल उभारला होता. दरम्यान, या पुलावरून खारघर वसाहतीत विनाअडथळा प्रवेश करता येत असल्याने खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांनी दुहेरी मार्गाचा मोठा पूल उभारण्याची मागणी पालिका तसेच सिडकोकडे केली होती. तसेच हा पूल तोडण्यासही विरोध केला होता. त्यामुळे तोंडावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात कोपरा येथील तात्पुरत्या पुलामुळे सायन-पनवेल महामार्ग पाण्याखाली जाण्याची भीती असल्यामुळे अखेर पोलिसांचा फौजफाटा घेऊन एक दिवसाचा हा तात्पुरता पूल पाडण्यात आला आहे.
- कारवाईसाठी पोलिसांचा फौजफाटा
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रात्री बाराच्या सुमारास सिडकोने हा पूल तोडण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी जेसीबी, पोकलेन तसेच काही कामगारांना घेऊन पुलाच्या तोडकामाला सुरुवात करताच खारघर कॉलनी फोरमच्या साठ ते सत्तर सदस्यांनी या कामाला विरोध केला होता. त्यामुळे नागरिकांचा प्रखर विरोध पाहून सिडकोला माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे या वेळी होणारा संभाव्य विरोध लक्षात घेता सिडकोने पोलिसांच्या सरंक्षणात ही कारवाई केली. - महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या वेळी कोपरा पुलालगत सिमेंटचा एक पाईप टाकून हा तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. दरम्यान, पावसाळ्यात खारघर डोंगरावरील पावसाचे पाणी महामार्गावर येण्याची शक्यता होती. त्यामुळे सिडकोने पूर्वीप्रमाणे नाला पूर्ववत केला आहे.- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघ
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai