खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


सुकापूरमधील भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

पनवेल ः पनवेल तालुक्यातील पाली देवद (सुकापूर) पाणीपुरवठा योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे पाणीपुरवठा समितीचे तत्कालीन अध्यक्ष एकनाथ भोपी व सचिव जी.आर.नाईक यांच्याविरोधात अखेर 23 नोव्हेंबरला रात्री खांदेश्वर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या कारभाराविरोधात जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, चंद्रकांत पोपेटा, योगेश पाटील व इतर ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या. माहितीच्या अधिकारान्वये माहिती घेण्याचा प्रयत्न अर्जदारांनी केला असता, ही समिती माहितीच्या अधिकाराखाली येत नसल्याचे उत्तर समितीने दिले होते. त्यामुळे या समितीचा कारभार सपशेलपणे भ्रष्टाचारीच आहे, हे स्पष्ट झाले होते. समितीच्या गैरकारभाराविषयी अमित जाधव यांनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये, तसेच ग्रामविकास विभाग सचिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या भ्रष्टाचाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी व तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. त्यानुसार पाणीपुरवठा समितीच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चौकशी समिती नियुक्ती केली होती. 

या चौकशी समितीने पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचे व अनियमितता केल्याचे अहवालामध्ये स्पष्ट अभिप्राय दिले, मात्र रायगड जिल्हा प्रशासनाने चौकशी अहवालाची दखल न घेतल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयामध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने सकतदर्शनी अनियमितता, अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद करून पाणीपुरवठा समितीमधील दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. 

समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी सूचनांची अंमलबजावणी न करता आदेश झुगारून आपले नियमबाह्य व मनमानी कामकाज सुरू ठेवत जनतेच्या पैशांचा अपहार करीत पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने भ्रष्टाचार केला. त्यामुळे या अपहारप्रकरणी समितीचे तत्कालीन अध्यक्ष एकनाथ भोपी व सचिव गजानन नाईक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद अमित जाधव, पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायत सदस्य योगेश यशवंत पाटील, ग्रामस्थ महेश जनार्दन पाटील, ज्ञानदेव मंगल पाटील व राजेश जनार्दन पाटील यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. दरम्यान 22 नोव्हेंबरला उपोषणस्थळी उपोषणकर्ता ज्ञानेश्वर मंगल पाटील यांची प्रकृती अस्थिर होती. या आंदोलनास अनेकांनी पाठिंबा दिला. आंदोलनाची तीव्रता अधिक वाढत गेली. अखेर शुक्रवारी रात्री एकनाथ भोपी व जी. आर. नाईक यांच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट