Breaking News
प्रतिकिलो 60 रुपये
नवी मुंबई ः परराज्यातून आणि महाराष्ट्रातुन होणारी टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे भाव चांगलेच वधारले आहेत. 20-30 रुपये किलो मिळणारे टोमॅटो 60 रुपयांवर येऊन ठेपले आहेत.
किरकोळ आणि घाऊक या दोन्ही बाजारात टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात काल प्रतिकिलो 18-28रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो 28-40रुपयांनी विक्री होत आहेत तर किरकोळ बाजारात 60 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. वाशीतील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे दरवाढ झालेली आहे.
घाऊक बाजारामध्येच 28-40 रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहे. बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून बंगळुरूवरुन होणारी आवक ही पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणी ही मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाही. आधी बाजारात टोमॅटोच्या 40-50गाड्या दाखल होत होत्या, मात्र आता उत्पादन कमी झाले आहे. एपीएमसीत 50%आवक असून टोमॅटोच्या 20-25 गाड्या दाखल होत आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत टोमॅटोला कवडी मोल बाजारभाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने उत्पादन कमी आहे,असे मत व्यापारी व्यक्त करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai