चौथा कॅलिफेस्ट अर्बन हार्टमध्ये

नवी मुंबई ः भारतीय संस्कृतीची समृद्धी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वैविध्यात सामावली आहे. हीच बाब भारतीय भाषांच्या संदर्भातही तितकीच सत्य आहे. त्यासाठी त्या भाषांपर्यंत पोहोचायला हवं, तरच हे सौंदर्य न्याहाळता येते. ही संधी प्राप्त करून देण्यासाठीच अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे चौथ्या कॅलिफेस्टचं नवी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. सिडकोच्या कलाग्राम अर्थात अर्बन हार्टमध्ये 5 डिसेंबरपासून हा फेस्ट सुरु झाला असून 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहील. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत ते सर्वांसाठी खुले राहील. 

देशभरातील विविध राज्यांतील 12 अग्रणी शब्द-शिल्पकार आपापल्या भाषांच्या लिप्यांतील सौदार्याविशाकार या महोत्सवात मांडली आहेत. गेली पाच दशके नाट्यशीर्षक रचनांद्वारे आणि विविध मनोरंजन कार्यक्रमांच्या शीर्षक लेखानाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कमल शेडगे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफीतर्फे हा पुरस्कार देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. 

सुलेखन म्हणजे केवळ सुंदर किंवा सुवाच्च्य लेखन नव्हे, ती एक दृश्य कला आहे. ही कला लोकप्रिय करणे हा कॅलिफेस्टचा मूळ उद्देश! जन-सामान्यांपर्यंत ही कला पोहोचविण्यासाठी अनेक-विध उपक्रम अच्युत पालव यांनी आजवर पार पाडले आहेत. शब्द-शिल्पांचा हा महोत्सव त्यापैकीच एक. या महोत्सवात कॅलिग्राफीची अन्य कलांशीही सांगड घालुन मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. बहुभाषिक भारतातील सर्व भाषांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर आपापल्या शैलीत काम करून हे कला विकसित करणार्‍या शब्द-शिल्पकारांर्‍या या मेळाव्यात कलारसिकांना, कालाभ्यासाकांना आणि विविद भाषिकांना आपापल्या भाषेतील शब्द-शिल्पांचे अनेकविध अविष्कार पाहण्यास मिळतील. विविध क्षेत्रात केला जाणारा या कलेचा वापर पाहण्याची संधीही नागरिकांना मिळत आहे.  

लिप्यांच्या स्थित्यंतराचे आणि विकासाचे पुरावे असणारी प्राचीन नाणी आणि दस्तावेज याच्न्हे प्रदर्शन, शालेय शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थ्यासाठी अक्षरलेखन सुधारणा कार्यशाळा, प्रात्याक्षिके असा भरगच्च कार्यक्रम असलेल्या कॅॅलिफेस्ट 18चा लाभ घ्यावा असे आवाहन अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलग्राफीतर्फे केले आहे.