स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्या

नवी मुंबई : स्थानिक व मूळस्थानिक युवकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या 448 जागांसाठी नोकर भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देऊन 100 टक्के टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी, नवी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन पालिका आयुक्त आणि महापौरांना देण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 24 गावे व नऊ विभाग येतात. यामध्ये मूळ स्थानिक व स्थानिक रहिवाशांची लोकसंख्या 17 लाखांपेक्षा जास्त आहे. नवी मुंबईमध्ये राहणारे नागरिक हे पालिकेला विविध प्रकारचे कर भारतात म्हणून त्यांना नागरी सुविधा प्रशासनामार्फत दिल्या जातात. नियमित कर भरणार्‍या नवी मुंबईकरांच्या सहकार्यामुळे तसेच ज्यांचा शहराच्या विकासामध्ये मोलाचा वाटा आहे, अशा नवी मुंबईतील स्थानिक व मूळ स्थानिक युवकांना नोकर भरतीप्रक्रियेमध्ये अधिकार मिळाला पाहिजे व 100 टक्के टक्के जागा नवी मुंबईतील युवकांना राखीव ठेवल्या पाहिजेत, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने महापौर जयवंत सुतार आणि महापालिका उपायुक्त किरण यादव यांच्याकडे करण्यात आली आहे.