करंजाडेचा पाणी प्रश्न सुटला

पनवेल ः करंजाडे येथे गेल्या अनेक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या पुढाकाराने सुटला असून करंजाडेकरांना दिलेल्या शब्दाची त्यांनी पूर्ती केली आहे. 

करंजाडे नोडमध्ये पाणी व इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक संस्थेच्यावतीने सिडको विषयक समस्या निराकरण सभा अर्थात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ.प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांनी डिसेंबर महिन्याच्या आत पाणी प्रश्न सोडविण्याचे करंजाडेकरांना आश्वासित केले. त्यानुसार सिडकोच्या अधिकार्‍यांना आदेश देऊन टाकीचे काम पूर्ण करण्याचे सूचित करण्याबरोबरच त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने 01 डिसेंबरपासून करंजाडे मधील सर्व सेक्टरमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला असून त्याबद्दल येथील नागरिकांनी आ. प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले.