राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत खारघरची पूर्वा घोळप अव्वल

पनवेल : खारघर येथील रहिवासी पूर्वा घोळप या विद्यार्थीनीने नंदुरबार याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकाळवीट तीन सुवर्णपदके आपल्या पदरात पाडली आहेत. 1 ते 5 डिसेंबर याठिकाणी 29 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पीड स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उत्तम कामगीरी करत पूर्वाने यशाला गवसणी घातली. 

पूर्वा घोलप येथील खारघरचा राजा स्केटिंग अकादमी मार्फत स्केटिंगचे शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक महम्मद सियाद यांच्यामार्फत पूर्वाला स्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे. नंदुरबार याठिकाणी आयोजित या राज्यस्तरीय स्पर्शेत महाराष्ट्रातील विविध विभागातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. याठिकाणी आयोजित स्पर्धेच्या तीन्ही वेगवेगळ्या प्रकारात पूर्वाने अव्वल क्रमांक पटकाविले आहे. पूर्वाच्या या कामगिरीबद्दल पूर्वाची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणम येथे करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 19 वयोगटातील हिमाक्षी धार हिने देखील रायपूर येथे आयोजित स्पर्धेत सिल्वर पदक प्राप्त केले आहे. पूर्वा व हिमकशीच्या या यशाबद्दल खारघरचा राजा स्केटिंग अकादमीचे संस्थापक विजय पाटील यांनी अभिनंदन केले आहे.