Breaking News
नवी मुंबई ः 17 सप्टेंबर पासून संपूर्ण देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमास सुरुवात झाली असून इंडियन स्वच्छता लीग 2 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कार्यात स्वतःचे वेगळेपण नेहमीच प्रदर्शित केले असून इंडियन स्वच्छता लीग 2 मध्येही लोकसहभागावर विशेष भर देत विविध उपक्रमांचे व्यापक स्वरूपात आयोजन केले जात आहे.
17 सप्टेंबरला संपूर्ण नवी मुंबई शहरात आठही विभागांमध्ये तब्बल 1 लक्ष 14 हजारांहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. या भव्यतम उपक्रमामधून स्वच्छताविषयक जागरूकतेचे आणि एकात्मतेचे विहंगम दर्शन घडले. याचवेळी खाडी किनाऱ्यावर पाच ठिकाणी राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहिमेत 10300 हून अधिक नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यामध्ये युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती. या खाडीकिनारी स्वच्छता मोहिमेत दिल्ली पब्लिक स्कूल जवळील किनाऱ्यावर 1700, तलावा सागरी किनारा करावे येथे 2500, टी एस चाणक्य करावे किनाऱ्याजवळ 1900, शिवमंदिर (डोलावा) किनारा या ठिकाणी 3000 तसेच सारसोळे जेट्टी या ठिकाणी 1200 अशा प्रकारे 10300 हून अधिक महिला व पुरुष नागरिकांनी या किनाऱ्यावरील खारफुटी स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला.
या खारफुटी स्वच्छता मोहिमेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज नेरूळ, सरस्वती कॉलेज सीबीडी बेलापूर, विद्या प्रसारक कॉलेज सीबीडी बेलापूर, डी वाय पाटील कॉलेज बेलापूर, एनआरआय कॉम्प्लेक्स पदाधिकारी, सूर्योदय बँक कर्मचारी बेलापूर, एस व्ही पटेल कॉलेज सीवूड्स, एस एस हायस्कूल सीवूड्स, ज्ञानदीप सेवा मंडळ विद्यालय करावे, एसआयईएस कॉलेज नेरूळ, टी एस चाणक्य युनिव्हर्सिटी करावे, स्टर्लिंग कॉलेज फार्मसी नेरूळ, टिळक कॉलेज नेरूळ, एस के कॉलेज नेरूळ, आयसेफ सामाजिक संस्था, डिवाइन फाऊंडेशन, पोलीस अकादमी नेरूळ, सागरी सीमा मंच, मॅन्ग्रुव्हज सोल्जर समूह, इंदिरा गांधी कॉलेज घणसोली, टिळक कॉलेज घणसोली, छबी फाऊंडेशन, जयश्री फाऊंडेशन अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, एनसीसी व एनएसएस विद्यार्थी, शिक्षक तसेच स्वच्छताप्रेमी नागरिक या खारफुटी स्वच्छता मोहिमेत अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते. परिसर स्वच्छतेप्रमाणेच सागरी किनारपट्टी स्वच्छता ही देखील अत्यंत महत्त्वाची असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेद्वारे सागरी किनारा स्वच्छतेचे महत्व विविध संस्था प्रतिनिधी, युवकांनी व नागरिकांनी अधोरेखित केले. यावर्षी इंडियन स्वच्छता लीग 2 चे घोषवाक्य कचऱ्याविरोधातील युवकांची लढाई अर्थात हे असून या खारफुटी स्वच्छता मोहिमेत विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत ही संकल्पना सार्थ केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai