मिस्टीक 2018 फॅशन शो दिमाखात

नवी मुंबई ः गृहिणी या नेहमी आपल्या कुटूंबाला वेळ देतात. त्यांना आरोग्य, फिटनेस व कलागुणानां वाव मिळत नाही. हीच गोष्ट लक्ष्यात घेऊन फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत वेगळ्या संकल्पनेवर आधारित मिस्टीक या फॅशन शो चे दरवर्षी आयोजन करतात.

   यावर्षी मिस्टीक 2018 या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच वाशी येथील सिडको सभागृहात करण्यात आले. हा कार्यक्रम फॅशन शो न ठरता एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरला.यावेळी अभिनेता अमन वर्मा, श्वेता मेहता (एमटीव्ही रोडीजची विजेती ),अभिनेत्री श्वेता सिन्हा (सासुराल सिमर का), अभिनेत्री अनुष्का रमेश, व इतर कलाकार उपस्थित होते.  

गृहिणींना फॅशन शो च्या माध्यमातून आत्मविश्वास वाढावा या हेतूने फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत यांनी डिझाईन केलेले कपडे घालून रॅम्प वॉल्क केला. नवी मुंबईतील गृहिणींनी चार आठवडे मेहनत घेऊन हा फॅशन शो यशस्वी केला. या दरम्यान पथ्य पाणी आणि व्यायामावर विशेष लक्ष्य देण्यात आले. लग्न झाल्यावर जबाबदार्‍या वाढतात या सर्वातून आपले कलागुण सादर करण्या करिता  मिस्टिक हा कार्यक्रम एक व्यासपीठ ठरला. आनंदाची गोष्ट म्हणजे नवी मुंबई शहरात फॅशन शो होतात आणि त्याची फॅशन क्षेत्रात चर्चा होते हे शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी माहिती फॅशन डिझायनर जुवेरिया नुसरत यांनी दिली. अर्जून कपूर, रिचा हावरे ( राजकुमारी), मंजू मिनू (बक्शा) या फॅशन डिजाईनर चे डिजाईन कपडे सर्वच सौंदर्यवतीने तसेच पुरुष मॉडेल यांनी परीधान केले होते.