वाहनविक्री मंदावली

नवी मुंबई : आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका वाहन व्यवसायाला बसला आहे. नवी मुंबईतही वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात घटली आहे. आर्थिक वर्षांचा विचार करता 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये एकूण वाहन खरेदी नोंदणीत तीन हजार 762 वाहनांची घट झाली आहे. यात सर्वाधिक घट रिक्षा प्रवासी वाहनात झालेली आहे.

नवी मुंबईच्या 14 लाख लोकसंख्येच्या तुलनेत निम्मी अर्थात सात लाख वाहनांची संख्या आहे. दरवर्षी अंदाजे 12 ते 14 हजार दुचाकींची विक्री होते. या संख्येत यंदा घट झाली आहे. चारचाकी खरेदीत 2019 मध्ये केवळ टॅक्सी प्रवासी वाहनांची खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मात्र, अन्य वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे.

156.72 कोटी रुपये उत्पन्न 2018 साली कर रूपाने शासनाला मिळाले.

139 कोटी रुपये उत्पन्न 2019 साली कर रूपाने शासनाला मिळाले.

वाहननामा 2018 2019

दुचाकी  12,000 10,696

कार 4,861 4,471

टॅक्सी 100 733

मोठी वाहने 1700 1550

रिक्षा 4,500 2,852

एकूण 24,695 20,933