पुन्हा प्रियंका रेड्डी होऊ देणार नाही

विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अभियान

नवी मुंबई ः  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी (महिला सक्षमीकरण कमिटी) यांचा संयुक्त विद्यमाने तरुणींमधील आत्मविश्वास जागृत व्हावा या उदात्त हेतूने मिशन साहसी या विद्यार्थिनी स्वसंरक्षणाचे शिबिर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात संपन्न झाले. 

मिशन साहसीचे उदघाटन अभाविपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ व महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी.डी. भोसले सर यांचा हस्ते पार पडले. विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना अनिकेत ओव्हाळ यांनी पुन्हा प्रियंका रेड्डी होऊ देणार नाही असा निर्धार करत विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी नेहमी सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिबिराच्या समारोपासमयी महिला सक्षमीकरण कमिटीच्या प्रमुख प्रा.सुजाता बोटे मॅडम यांनी अभाविपचे शिबिर आयोजन केल्याबद्दल आभार मानले. सदर कार्यक्रमा दरम्यान अभाविप नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रा.निळकंठ बिजलगावकर, संयोजक अमित ढोमसे, सहसंयोजक शंकर संगपाळ, महाविद्यालय प्रमुख कृष्णा दुबे,जिल्हा विस्तारक अजित धायगुडे हे उपस्थित होते.