आर्ट फिएस्टा वार्षिक महोत्सवाचे आयोजन

13 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान 

नवी मुंबई ः नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि अगदी पुण्यातल्याही कलाप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय असलेल्या पाचव्या आर्ट फिएस्टा’चे 13 ते 15 डिसेंबर 2019 दरम्यान वाशी काली मंदीर, सेक्टर 6, वाशी येथे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई बेंगाली असोसिएशनतर्फे (एनएमबीए) आपल्या परिसरात पेंटिंग्ज आणि शिल्पांचे हे भव्य विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसांत काही प्रसिद्ध कलाकारांच्या कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

पेंटर्स, पोर्टेट मेकर्स, स्केच आर्टिस्ट आणि कलेच्या इतर प्रकारांत रमलेल्यांना या संधीचा कलेप्रती असलेली तळमळ आणि आपली सर्जनशील सर्व सॅटेलाइट शहरांत दाखवण्यात येईल. कलेची आवड असलेल्या हौशी कलाकारांनीही त्यांची कला मांडण्यासाठी या प्रदर्शनात सहभागी होता येईल. त्यांना आपली सर्जनशीलता आणि कलेविषयी तळमळ येथे दर्शवता येईल. हे प्रदर्शन 15 वर्षापुढील सर्वांसाठी खुले आहे. प्रसिद्ध कलाकारांची समिती अंतिम निवड करून सहभागींना तसे कळवणार आहे.