खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


मणक्यातील चकती संबंधित विकार आणि उपचार

धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे शारिरिक विकारातही वाढ होत चालली आहे. असा एक विकार म्हणजे मणक्यातील चकती सरकणे यालाच स्लीप डिस्क असेही म्हणतात. या विकाराची व त्यावरील आयुर्वेदीय उपचाराची आज आपण माहिती घेऊया.

मणक्यातील चकती म्हणजे काय?

आपल्या पाठीचा कणा अनेक मणक्यापासून तयार होत असतो. या मणक्यामधील पोकळीतून मज्जारज्जू जात असतो. हे मणके एकावर एक असे बसवलेले असतात. या दोन मणक्याच्या मुख्य भागाच्या मधोमध जी चकती असते तिला इंटरव्हल डिस्क असे म्हणतात. विविध आघातांचे शोषण करून पाठीच्या कण्याचे रक्षण करण्याचे मुख्य काम ती करत असते. याचबरोबर दोन मणक्यामधील हालचाल ही सुलभ करत असते. चकतीचा मध्यवर्ती भाग हा स्पंजाप्रमाणे मऊ तर कडेचा थोडा भाग कठीण असतो. ही चकती दोन कठीण स्वरूपाच्या प्लेटनी आच्छादित असतो. व या प्लेटवर व खाली दुसर्‍या मणक्याशी जोडलेल्या असतात. स्वाभाविक अवस्थेत ज्यावेळी आपण पुढे वाकतो त्यावेळी नेहमीच चकती थोडीशी मागे मज्जारज्जूच्या पोकळीत थोडीशी सरकत असते.

चकती सरकण्यामागची कारणे -

बहुतांश वेळा कोणत्याही कारणाने होणारा आघात हे चकती सरकण्याचे मुख्य कारण असते. अशा वेळी अचानक उत्पन्न झालेल्या तीव्र ताणामुळे चकतीच्या मागील स्नायुवर परिणाम होतो आणि चकती सरकते. पुढे वाकून सतत काम करणार्‍या व्यक्तीत हा प्रकार सहजतेने घडतो. काही वेळा सतत येणारा शारिरीक अथवा मानसिक ताण यामुळेही चकती सरकते. वार्धक्यामुळे चकतीची तन्य शक्ती कमी होते. अशी दुर्बल कमजोर चकती शरीराचा ताण सहन करण्यास असमर्थ ठरून सरकू शकते. अशा वेळी मोठ्या आघाताची नसते. थोड्या प्रकरचा वाढलेला ताण अथवा किरकोळ आघातानेही वार्धक्यात चकती सरकल्याचे आढळते. कंबरेच्या चौथ्या व पाचव्या मणक्यातील पाचव्या व माकड हाडातील चकती सरकण्याचे प्रमाण  सर्वात जास्त आढळत तसेच मानेच्या 5 आणि 6 आणि 7 व्या मणक्यातील चकतीही अनेकदा सरकल्याचे आढळून येते.

चकती सरकल्याची लक्षणे -

चकती सरकल्यामुळे संबंधित जागेला सूज येते व त्यानंतर वेदना होऊ लागतात. त्याबरोबरच ज्या शिरेवर / नाडीवर दाब पडेल त्या भागात वेदना, चमका, जखडणे, मुंग्या येणे, बधीरपणा ही लक्षणे जाणवतात. ज्यावेळी सूज कमी होईल अशा वेळी काही जणात चकती पुनश्‍च स्वत:च्या जागेवर जाते तर काही जणांत तशीच राहते. दोन मणक्यातील सांध्यामधील अंतर कमी होते तसेच दोन मणक्याच्या मधील सांध्यापासून सूज येते. त्यामुळेच मणक्यांमधील हालचाल बिघडते.

कंबरेतील चकती सरकणे -

यालाच लंबर डिस्क प्रोलॉस असे म्हणतात. सरकलेल्या चकतीचा दाब नाड्यांच्या अथवा शिरांच्या मुळावर पडल्याने विविध लक्षणे उत्पन्न होतात.

लक्षणे -

खालच्या बाजूला कंबर दुखणे आणि कालांतराने कंबरेतून खाली संपूर्ण पायात कळा येणे. असा त्रास होतो. काही जणांत कंबरदुखी व पायातील कळा एकदमच सुरू होतात. साधारणपणे जड वजन उचलणे, गर्रकन वळणे या क्रियेनंतर अचानकपणे या वेदना सुरू झाल्याचे आढळते. काही वेळा या वेदना काही तासापासून अनेक किरकोळ कंबरदुखीच्या असणार्‍या वेदना कंबरेवर ताण आल्यावर जाणवत असतात. व कालांतराने कंबरदुखी वाढत जाते. जखडल्याच्या स्वरूपात काही जणांत तर चमकणे या स्वरूपात काही जणात जाणवत असतात. कंबरेच्या मध्य भागाकडून सुरू होणार्‍या वेदना एका अथवा दोन्ही खुबांकडे जाणार्‍या तर काही वेळा पायाकडे जाणार्‍या असतात. खोकल्यानंतर, ऊठ - बस करताना ताण पडल्यावर पसरत असतात. दुखावलेल्या नाडी अथवा शिरेच्या दिशेप्रमाणे त्या भागात सुया टोचल्या प्रमाणे होणे, स्नायू वेदना, मुंग्या इत्यादी तक्रारी देखील जाणवत असतात. चालताना कंबरेत किंचित एका बाजूला झुकले जाते तसेच पुढे वाकण्याची क्रिया देखील त्रासदायक ठरत असते.

जास्त काळ हा विकार राहिल्यानंतर मांडया अथवा स्नायुंची झीज होऊन त्यांचा आकार लहान झालेला असतो काही वेळा पायातील स्नायुची ताकद कमी झालेली असते.

मानेतील चकती सरकणे - सर्व्हायकल डिस्क प्रोलॅप्स-

मानेची चकती सरकणे हा प्रकार तुलनेने कमी प्रमाणात आढळून येतो. मान दुखणे, मान आखडणे, मान वळविताना त्रास होणे या तक्रारी आढळतात. मानेत सुरू होणार्‍या वेदना खांद्याकडे, दंडाकडे व तेथून हाताकडे पसरतात. काही वेळा या वेदना पाठीकडे जाऊ शकतात. हाताला मुंग्या येणे, हात जड होणे, हाताला बधीरपणा, ताकद कमी वाटणे, या तक्रारी कमी अधिक प्रमाणात जाणवतात.

चकती सरकण्यावरील उपचार -

चकती सरकणे या विकारात कंबरेला अथवा मानेला पूर्ण विश्रांती देणे हा सगळ्यात महत्त्वाचा उपचार असतो. आधुनिक शास्त्राप्रमाणे वेदनाशामक, सूज कमी करणारी औषधे, ट्रॅक्शन लावणे, असे प्रथमत: उपचार केले जातात याने पूर्ण आराम न मिळाल्यास शस्त्रकर्म केले जाते.

चकती सरकण्यावर वरदान सांघिक आयुर्वेदी उपचार -

अनेक वेळा आधुनिक औषधांनी पूर्णपणे आराम मिळत नसतो. अशा वेळी तसेच शस्त्रकर्म करणे शक्य नसते अशा वेळी आणि काही वेळा शस्त्रकर्म केल्यानंतर देखील तक्रारी पूर्णपणे बंद होत नाहीत. अशा रूग्णांना आयुर्वेदीय तत्वाप्रमाणे सांघिक आयुर्वेदीक उपचार केल्यास उत्तम फायदा होतो असा माझा 22 वर्षांचा अनुभव आहे. यासाठी सुरूवातीला रूग्णाच्या त्यांची तीव्रता त्या कधी वाढतात, कधी कमी होतात, इत्यादींची सखोल माहिती घेऊन आणि आयुर्वेदातील नाडी, प्रकृती इत्यादी अष्टविध परीक्षांनी रूग्ण तपासणी केली जाते. तसेच रूग्णाच्या एक्स रे, एम. आर. आय. यामधील दोषांचा अभ्यास करून उपचार ठरविले जातात. हे उपचार करताना औषधे, पंचकर्म व्यायाम, योगासने आणि वर्तणूकीतील बदल यांचा सांघिक उपयोग केला जातो.

आयुवेदातील गुडची, रास्ना, पुनर्नवा, दशमुळ, निर्गुडी, गोखरू, अश्‍वगंध, गुग्गुळ, कवचबीज, शतावरी, शृंग, कुकुटांडत्वक इ. भस्माच्या एकत्रिकरणातून तयार झालेली संयुक्त औषधे दिली जातात.

औषधाबराबरच पंचकर्म उपचाराला या विकारात महत्व आहे. विविध प्रकारच्या औषधी तेलाने मसाज, औषधी वाफेने अथवा तेलाने शेकणे, बस्ती, कटीबस्ती इ. चा अतिशय उत्तम उपयोग होतो. या बरोबरच रूग्णाच्या प्रकृतीप्रमाणे आहार, योग्य व्यायाम, योगासने, यांचेही मार्गदर्शन महत्वाचे आहे ॥ आर्यलोक॥ या आमच्या सातार्‍यातील सुसज्ज आयुर्वेदीक रूग्णालयात या पध्दतीने केल्या जाणार्‍या सांघिक उपचारांनी महाराष्ट्रातील अनेक रूग्ण वेदनामुक्त झाले आहेत.

थोडक्यात महत्वाचे -

मणक्यातील चकती सरकल्याचे निदान झाल्यावर घाबरून न जाता आयुर्वेदिक सांघिक उपचारांचा तज्ञांकडून अवलंब केल्यास उत्तम फायदा होतो.

डॉ. आनंद ओक, आयुर्वेदाचार्य


रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aaple Rajya News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट