Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छता उपक्रमांमध्ये विविध माध्यमांतून सक्रिय सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, उदयोग समुह व नागरिकांना स्वच्छता कार्यातील मौलिक योगदानाबद्दल महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात ‘स्वच्छता चॅम्पियन' प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
अशाप्रकारे स्वच्छतेच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभागी होणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान त्यांना आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहीत करणारा व इतरांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा देणारा असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. त्यांच्यासह केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे संचालक श्री.तपनकुमार राऊत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या हस्ते ‘स्वच्छता चॅम्पियन' प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचा नवी मुंबईतील श्री सदस्य समुह, अंकुर सामाजिक संस्था नेरूळ, अमृतानंदमयी मठ नेरूळ, संत निरंकारी मंडळ बेलापूर, रोटरी कल्ब ऑफ स्मार्ट सिटी बेलापूर, सिनिअर सिटीझन हेल्थ केअर फाऊन्डेशन ऐरोली, डिव्हाईन फाऊन्डेशन बेलापूर, शृंखला ऑर्गनायझेशन बेलापूर, लेट्स सेलिब्रेट फिटनेस वाशी, बिंदूरा फाऊन्डेशन बेलापूर, तृतीयपंथी संस्था कोपरी या स्वयंसेवी संस्थांना सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे संकल्प वेल्फेअर असोसिएशन बेलापूर, सेल्फ वॉक फाऊन्डेशन बेलापूर, समता महिला मंडळ सिवूड, सागरी सीमा मंच कोकण प्रांत, श्री करिअर ॲकॅडमी नेरुळ, सिवूड रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन हे नागरिक समुह आणि बेलापूर येथील पद्माकर बाळकृष्ण पाटील, चंद्रशेखर खेरोडकर व निलांजना माथुर या स्वच्छताप्रेमी नागरिकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शेल्टर असोसिएट्स, बीएएसएफ कंपनी, सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि एल अँड टी रिअल्टीस यांनी स्वच्छता कार्यासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सीएसआर निधीबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai