Breaking News
मुंबई : इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स ही विविध उपक्रमातंर्गत वेगवेगळ्या विषयांवर पालक तसेच नागरिकांध्ये जनजागृती निर्माण करण्याचे उद्दीष्ठ समोर ठेवून विविध कार्यक्रम राबत असते. लठ्ठपणा, गोवर, ऑटिझम, डाउन सिंड्रोम आणि थॅलेसेमिया यांसारख्या विषयांवर उपक्रम राबविल्यानंतर आयएपीने आता खोकल्याचा वाढता धोका आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी “टॅकलिंग कफ विथ केअर” या 8व्या राष्ट्रीय जागरूकता मोहीमेस सुरुवात केली आहे.
“आयएपी की बात, कम्युनिटी के साथ” या संकल्पनेतंर्गत बाल आरोग्याविषयक गंभीर समस्यांबाबत समाजात सर्वच स्तरांवर जनजागृती केली जाते. 2024 आणि 2025 च्या उपक्रमातंर्गत बाल आरोग्याविषयी महत्वाची माहिती प्रसारित करण्यासाठी विविध स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुलांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये आणि अंगणवाडी, नर्सरीमध्ये जाणाऱ्या वयोगटात खोकला ही सर्वात सामान्य आढळून येणारी आरोग्य समस्या आहे. वातावरणातील बदल, त्यामुळे होणारा संसर्ग आणि ऍलर्जी ही खोकल्याची सर्वात सामान्य कारणे आहेत. संसर्गजन्य आजारांवर वेळीच लसीकरण हे संरक्षणाच्या दिशेने एक सकात्मक पाऊल ठरत आहे. मुलांना खोकल्यासंबंधी विशेष काळजी, खोकताना आपल्यामुळे इतरांना जंतू संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी आवश्यक माहिती पालक आणि संबंधित घटकास दिल्यास हा संसर्ग रोखण्यास मदत होते. या मोहिमेचे डॉ. एस. नागभूषण, डॉ. बी. एस. शर्मा, डॉ. शिल्पा हजारे, डॉ. इंद्रनील हलदर, डॉ. पवन कल्याण पी, यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या प्रतिष्ठित चमूसह डॉ. पियाली भट्टाचार्य, डॉ. गायत्री यांचा समावेश असलेली वैज्ञानिक समिती बेझबोरुआ, डॉ. प्रशांत व्ही कारिया, डॉ. मुबशीर हसन शाह, डॉ. चेरुकुरी निर्मला आणि डॉ. मनमीत कौर सोढी यांचा समावेश आहे.
“आयएपी की बात, कम्युनिटी के साथ” मोहीम देशभरातील मुलांचे आरोग्य चांगले राखण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. 3 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकल्यासारखी श्वसनासंबंधी विकारांची लक्षणे आहेत. प्रतिजैविकांच्या सततच्या गैरवापरामुळे 40% मुलांना श्वासोच्छवासाच्या संसर्गाचा त्रास होत आहे. वैद्यकीय तज्ञांसाठी आयएपीव्दारे वैद्यकीय प्रशिक्षण उपक्रम आयोजित करून आम्ही खोकल्याबद्दल अचूक आणि विश्वासार्ह माहिती प्रदान करत, पालक आणि नातेवाईकांना मुलांच्या आरोग्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करत आहोत. -डॉ. जी.व्ही. बसवराजा, राष्ट्रीय आयएपी अध्यक्ष 2024
“विविध उपक्रमांद्वारे आणि व्यापक प्रसाराद्वारे, खोकल्यासारख्या आरोग्य समस्यांना दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जे मुलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे. - डॉ. वसंत खळटकर, राष्ट्रीय अध्यक्ष 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai