टोप्या आणि रुमाल वाटप

मदर इंडिया क्रोशे क्वीन मुंबई विभागाच्या आणि कर्नाटकच्या एमआयसीक्यू च्या महिलांनी एकत्र येऊन तळोजा येथील सत्य साई हार्ट रुग्णालयातील लहान मुलांसाठी क्रोशाने विनलेल्या टोप्या आणि रुमाल वाटप केले. यावेळी कर्नाटकहुन कल्पना हेबलेकर आणि काही महिला तसेच मुंबई, नवी मुंबईतील चारु त्रेहान, साधना घंटी, अंजली, प्रतिभा,देवेंदर कौर, सुमंगळी, रिद्धी व इतर यावेळी उपस्थित होत्या.