Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबईकरांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहावे यासाठी आ. मंदा म्हात्रे अनेक वर्ष पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून रुग्णालय उभारण्यासाठी 250 कोटींच्या ई-निविदा प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे रुग्णालय दृष्टीपथात आले असल्याने नवी मुंबईकरांना लवकरच आरोग्याच्या दर्जदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल असे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवी मुंबईतील गरजू व सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा मिळण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी परराज्यात जावे लागू नये यासठी शहरातच सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा केला. शासनाकडून मंजुरी मिळवली. रुग्णालयाच्या भुखंडासाठी व किमंत कमी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले असून आता प्रत्यक्ष कामाला गती आली आहे. राज्य सरकार, सिडको, पालिकेकडून सर्व लागणाऱ्या परवानग्या, मान्यता आणि मंजुरी मिळाल्याने रुग्णालय उभारण्यासाठी 250 कोटींच्या ई-निविदा प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. याप्रक्रियेनंतर रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. प्रकल्प पुर्ण झाल्यावर नवी मुंबईकरांना उपचारासाठी तसेच वैद्यकिय शिक्षणासाठी शहराबाहेर जावे लागणार नाही. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हा नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल असे आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून या कामासाठी जो लढा सुरु होता त्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक प्राप्त स्वरूप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिला त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातवरण पसरले असून सर्वांकडून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, विक्रम पराजुली, विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, जयश्री चित्रे, प्रमिला खडसे, सुवर्णा चिकणे आदी कार्यकर्ते व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai