Breaking News
नवी मुंबई ः महापालिका कार्यक्षेत्रात पाणी देयके भरण्याकरिता यापूर्वीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तथापि सध्याच्या काळात विविध देयके भरण्याकरिता नागरिकांकडून मोठया प्रमाणात होणारा विविध पेमेंट ॲपचा वापर लक्षात घेउुन नागरिकांच्या पाणी देयकावर क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. देयकांवरील क्यू आर कोड स्कॅन करुन अगदी सहजपणे आपली पाणी देयके भरणा करु शकतात.
माहे जून-जुलै 2024-2025 च्या पाणी देयकावर क्यू आर कोड छपाई करण्यात आला आहे. प्रत्येक पाणी देयकावर ग्राहकनिहाय स्वतंत्र क्यू आर कोड छपाई करण्यात आलेला आहे. सदर क्यू आर कोड गुगल लेन्सने स्कॅन केल्यावर एक लिंक नागरिकांच्या स्क्रीनवर येईल. त्यावर क्लिक केले असता मोबाईलमध्ये उपलब्ध असणाऱ्या पेमेंट ॲपची यादी दर्शविली जाईल. त्यातून योग्य त्या ॲपची निवड करुन नागरिक आपले पाणी देयक भरणा करु शकतात. त्यामुळे नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागात व कार्यालयात न जाता आहे त्या ठिकाणाहून आपले पाणी देयक भरणा करता येउु शकते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच मोरबे धरण ते कळंबोली दरम्यान असलेल्या मुख्य जलवाहिनीवरील ग्रामपंचायतींकडील पाणी देयक थकीत असलेले ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने ‘अभय योजना' सद्यस्थितीत सुरु आहे. त्या अंतर्गत थकीत पाणी देयक ग्राहकांकरिता एकूण थकीत पाणी देयकामधील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने वितरीत करण्यात आलेल्या माहे जून - जुलै 2024 या कालावधीत पाणी देयकात नमूद केलेली थकीत पाणी देयकातील मूळ रक्कम व विलंब आणि दंडात्मक शुल्काची 25% रक्कम भरल्यास विलंब व दंडात्मक शुल्काची 75% रक्कम माफ होणार आहे. त्यासाठी संपूर्ण थकीत पाणी देयक रक्कम माहे जून-जुलै 2024 देयकाच्या विहित मुदतीत भरणा केल्यास सदर अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai