सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक पाटील

पनवेल ः सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक सोमवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अशोक पाटील यांची बहुमतांनी निवडून आले. त्यानिमीत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अशोक पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचाली करीता सदीच्छा व्यक्त केल्या.

या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, दत्ताशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे,  जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, माजी सरपंच चाहूशेठ पोपेटा, पांडूरंग केणी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने पस्थित होते.