Breaking News
पनवेल ः कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे व यांच्यावतीने रविवारी ‘चला हवा आली कामोठ्यात’ या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रसीकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे तसेच टीआपीएल यांच्यावतीने 16 फेब्रुवारी 2020 रोजी ’चला हवा आली कामोठ्यात’ या तीन तासांच्या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनीमधील सर्कस ग्राउंडवर करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कलाकार निलेश साबळे, श्रेया बुगडे, भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रीके, सागर कारंडे, यांच्यासह अनेक कलाकारांनी आपली हस्य कला सादर केली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटना वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, उद्योजक राजु गुप्ते, रवीनाथ पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी, हॅपी सिंग, आयोजक जय पावणेकर, जयप्रकाश पावणेकर, सुमित गोवारी, विपाल पावणेकर, अरुण पावणेकर, तुषार हिरवे, यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai