कॉम्फ्लेक्स सिटी महोत्सव

नवी मुंबई : संपूर्ण जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना तसेच देशात सर्वांना घरे देण्याचे आश्वासन दिले जात असताना, जे लोक या शहराला सुशोभित करण्यासाठी आणि या शहरातील लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात अशा लोकांना मात्र या सर्व प्रक्रियांमधून सहज वगळले जाते. त्या लोकांना विज, पाणी, शिक्षण इत्यादी अनेक गोष्टी मिळविण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत आहे. शहराच्या विकासातील त्यांचे योगदान कधीच कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणुनच शहरातील झोपडपट्टीत रहाणाऱया गोर-गरीब कष्टकरी लोकांच्या दैनंदिन संघर्षाला समजुन घेण्यासाठी तसेच त्यांच्या परिस्थितीला समजण्यासाठी संघर्षनगरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  

या प्रदर्शनात शहरी भागात झोपडट्टीत रहाणाऱया लोकांचे रहाणीमान,रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न, त्यानां येणाऱया दैंनिदन अडी-अडचणी मांडण्याचा प्रयत्न करण्यात  आला आहे. या प्रदर्शनाला पोलीस अधिकाऱयांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जुन भेट देत आहेत.   

युवा संस्थेच्या वतीने आयोजित कॉम्फ्लेक्ससिटी-2020 या महोत्सवातंर्गत खारघर ीयेथील युवा सेंटरमध्ये संघर्ष नगरी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पनवेलच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांच्या हस्ते झाले.  

यावेळी आरटीओचे अधिकारी सचिन पाटील, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता भोईर, महापे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता किंद्रे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेमांगीनी पाटील, दत्ता किंद्रे आणि व इतर अधिकाऱयांनी शहरी गरीबांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.  

यावेळी युवा संस्थेचे अनिल इंगळे यांनी युवा संस्था आणि शहरी संसाधन केंद्र याबाबत माहिती दिली. नामदेव गुलदगड यांनी कॉम्फ्लेक्ससिटी महोत्सवाची माहिती दिली. तर रोहन चव्हाण यांनी संघर्ष नगरी प्रदर्शनाबाबत उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खरात यांनी केले. यावेळी युवाचे साथी मरिना जोसेफ आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.