सीबीएसई शाळांतील प्रवेश प्रक्रिया सुरु

नवी मुंबई ः महानगरपालिके मार्फत कोपरखैरणे, सेक्टर-11 येथे सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.  सदर शाळेमध्ये सन 2020-21 साठी नर्सरी व इयत्ता 5वी ते 8वी करीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश पुर्णत: नि:शुल्क असल्याने या सुविधेचा लाभ पालकांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. 

खाजगी शाळेप्रमाणे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम तसेच सेवा सुविधा दिल्या जातात. पालिकेने सीबीएसई शाळाही सुरु केली आहे. सीबीएसई शाळा सुरु करणारी ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. कोपरखैरणे येथे सुरु केलेल्या या शाळेच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नर्सरी व इयत्ता 5वी ते 8वी करीता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रती वर्ग 60 विद्यार्थ्यांचा प्रवेश देता येणार आहे. पाल्याचा जन्मदाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड व वडिलांचा रहिवासी पुरावा,  शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट. उक्त नमूद शाळेतुन नि:शुल्क प्रवेश अर्ज 28 फेबु्रवारी 2020 पर्यंत (वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत) उपलब्ध आहेत. पालकांनी सदर अर्ज आवश्यक कागद पत्रांसह 29 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शाळेत सादर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. 

प्रवेशासाठी आवश्यक अटी :

1) प्रवेशासाठी शाळेपासून 1 कि.मी. चे आत अंतरावर राहणा-या विदयार्थ्यांना प्राधान्य देणेत येईल.

2) 30 सप्टेंबर 2020 रोजी उक्त नमूद केल्याप्रमाणे वय वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

3) इयत्ता 5वी ते 8वी प्रवेशाकरीता विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या उइडए शाळेत शिकत असलेला असावा.

4) इयत्ता 5वी ते 8वी करीता प्रत्येक वर्गात 20 पेक्षा जास्त विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास नैसर्गिक वाढीने वर्ग सुरू राहतील.

5) शिक्षण नि:शुल्क असुन बस सेवा उपलब्ध असणार नाही.

6) शाळा प्रवेशाचे सर्व अधिकार मा.आयुक्त, नमुंमपा यांचे स्वाधीन राहतील.