महापालिकेचे 3850 कोटींचे बजेट स्थायी समितीत सादर

स्थायी समितीस जमा व खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित व सन 2020-21 चे मूळ अंदाज

नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2019-20 चा सुधारित आणि सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीपुढे सभापती नविन गवते यांच्याकडे सादर केले. याप्रसंगी सर्व समिती सदस्य आणि अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड उपस्थित होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सदर जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1905.69 कोटी व रु. 2369.62 कोटी जमेचे आणि रु.3057.54 कोटी खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1217.76 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3850 कोटी जमा व रु. 3848.91  कोटी खर्चाचे आणि रु.1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे मूळ अंदाज स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले.