अमली पदार्थ सेवन विरोधी जनजागरण रँली

नेरूळ येथील एस आय ई एस महाविद्यालय, अन्वय नशामुक्ती केंद्र व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एस आय ई एस काँलेज ते नेरूळ रेल्वे स्थानकापर्यंत विद्यार्थ्यांची भव्य रँली काढण्यात आली. समाजात विशेषत: युवकांच्यात वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनांविरोधी जनजागृती व्हावी या हेतूने या रँलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रँलीत अन्वय केंद्राचे संचालक डॉ अजित मगदूम,  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष श्री प्रमोद कर्नाड, प्रा. टेसी, प्रा. सुनीता अंभोरे, अन्वयच्या विश्वस्त व स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रा. वृषाली मगदूम अंभोरे, अन्वयचे कार्यकर्ते  ज्ञानेश्वर भोगले, प्रमोद वाघमारे, अशोक हणमंते, अन्य शिक्षक वर्ग

तसेच अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. नेरूळ स्टेशन विद्यार्थ्यांनी आवारात दोन पथनाट्ये सादर केली. ’ एक दो एक दो तंबाखू को छोड दो ’, ’तंबाखू की आदत कँन्सरकी दावत’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रँलीनंतर डॉ अजित मगदूम यांनी अमली पदार्थांच्या घोर दुष्परिणांबाबत बोलताना नवी शंकास्पद पेये, पेपर ड्रग्ज, अमली पदार्थांचे मानवी मेंदूवर व शरीरावर होणारे परिणाम याविषयी सखोल प्रबोधन केले. शेवटी प्रा सुनीता अंभोरे यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.