सार्वजनिक आरोग्यावर भर देण्याची गरज

केंद्रिय  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन पाटील यांचे प्रतिपादन

पनवेल : भारतात काहीच संस्थांमध्ये सार्वजनिक आरोग्याचे शिक्षण दिले जाते. यापैकी राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन ही संस्था महत्त्वाची आहे. सध्या सार्वजनिक आरोग्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मत केंद्र्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या पनवेल येथील नवीन संस्थात्मक संकुलाचे उद्घाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. दीपक राऊत आदींसह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात येणार्‍या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. आयुष्मान भारत योजनेचा लाभ 86 लाख नागरिकांना झाल्याचे हर्ष वर्धन यांनी सांगितले.

जून 2019 मधील स्वच्छता आरोग्य निरीक्षक विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ झाला. नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संकुलामध्ये पॅरामेडिकल कर्मचार्‍यांसाठी दोन पूर्ण-वेळेचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये आरोग्य शिक्षण पदविका आणि समुदाय आरोग्य सेवा पदव्युत्तर पदविका  हे दोन प्रशिक्षण अभ्यासक्रम आहेत.