निरंकारी भक्तांचे स्वच्छता अभियान

देशभराती 1320 सरकारी रुग्णालये केली स्वच्छ 

पनवेल : निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या 66व्या जयंती दिनी 23 फेब्रुवारी, 2020 रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने देशातील 400 शहरांमधील तब्बल 1320 इस्पितळांची स्वच्छता करण्यात आली. या अभियानामध्ये संत निरंकारी मिशनचे सेवादल, फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि सामान्य भक्तगण मिळून 3.5 लाख निरंकारी भक्तांनी भाग घेतला होता. 

या स्वच्छता अभियाना अंतर्गत पनवेल येथील महानगरपालिका रुग्णालयासह उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली. मुंबई महानगर प्रदेशातील एकंदर 66 रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांची स्वच्छता करण्यात आली. या व्यतिरिक्त कित्येक पोलीस ठाणी, रेल्वे स्टेशन्स, सार्वजनिक उद्याने, महापालिका शाळा, सत्संगाची केंद्रे यांचीही स्वच्छता करण्यात आली, मुंबईतील गोवंडी, नवी मुंबईतील घणसोली आणि ठाणे येथील ओवळाइत्यादी ठिकाणी काही प्रमाणावर वृक्षारोपणदेखील करण्यात आले. 

स्वच्छतेमधून जमा होणारा कचरा घेऊन जाण्याची उचित व्यवस्था स्थानिक महापालिका प्रशासनाच्या मदतीने करण्यात आली होती.