Breaking News
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. इर्शाद खान असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. आरोपी याठिकाणी काय करत होता, याची पोलीस कसून तपासणी करत आहेत.
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती दिली जात आहे. कलानगच्या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले काही जण येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर युनिट 9 च्या अधिकार्यांनी तातडीने हा परिसर पिंजून काढला. त्यावेळी त्यांना इर्शाद खान संशयास्पद फिरताना आढळून आला. तो मातोश्रीजवळ 100 मिटर परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. तो एवढ्या सुरक्षीत भागात आला कसा आणि त्याच्याजवळ पिस्तुल आलं कुठून याचा तपास पोलीस करत आहेत.
‘मातोश्री’ ठाकरे कुटुंबीयांचं निवासस्थान असल्याने इथे कायम कडक सुरक्षा व्यवस्था असते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. अशा हाय सेक्युरीटी झोनमध्ये हा दरोडेखोर कसा आला? दरोड्यासाठी त्याचं टार्गेट कुठलं होतं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इर्शादवर आधीही अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत अशी माहितीही दिली जात आहे. या घटनेनंतर मातोश्रीच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेला आणखी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai