Breaking News
मुंबई : मुंबई कृषी बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे भाजपच्या भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा फुटला. 18 पैकी 16 संचालकांच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडीने जोरदार बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे. तर दुसरीकडे भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे नागपूर मधील बालेकिल्ल्यातही भाजपाला आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. यामुळे भाजपाच्या हाती भोपळा लागला असून महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची उमेद वाढवणारा निकाल ठरणार आहे. बाजार समितीवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्वाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न भाजपाने केला. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अपयश आले.
18 संचालकापैकी 12 संचालक शेतकरी प्रतिनिधी, पाच संचालक व्यापारी प्रतिनिधी, 1 संचालक कामगार प्रतिनिधी असणार आहे. सभापती पद हे कायद्याने शेतकरी प्रतिनिधीलाच भूषविता येते. सहा वर्षानंतर मुंबई बाजार समितीवर संचालक मंडळांची नियुक्ती झाल्याने शेतकरी वर्गाला न्याय मिळेल अशी आशा आहे. राज्यातील शेतकर्यांकडून मुंबई बाजार समितीत पाठविण्यात येणार्या शेतमालाला योग्य भाव देणे, त्याच्या मालाचे संरक्षण करणे, व्हेअरहाऊस उभा करून नाशवंत मालाचा दर्जा राखण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करील अशा आशा आहे.
विभागवार विजयी उमेदवार खालील प्रमाणे
पुणे विभाग -
1) बाळासाहेब सोळस्कर - राष्ट्रवादी काँग्रेस
2) धनंजय वाडकर - काँग्रेस
कोकण विभाग -
1) राजेंद्र पाटील - शेकाप
2) प्रभाकर पाटील - अपक्ष ( शिवसेना बंडखोर )
नाशिक विभाग -
1) अद्वैत हिरे - अपक्ष
2) जयदत्त होळकर - राष्ट्रवादी काँग्रेस
औरंगाबाद विभाग -
1) अशोक डक - राष्ट्रवादी काँग्रेस
2) वैजनाथ शिंदे - काँग्रेस
अमरावती विभाग -
1) प्रविण देशमुख - काँग्रेस
2) माधवराव जाधव - शिवसेना
नागपूर विभाग -
1) सुधीर कोठारी - राष्ट्रवादी काँग्रेस
2) हुकूमचंद आमधरे - काँग्रेस पक्ष
वाशी बाजार समिती
1) फळ मार्केट - संजय पानसरे
2) भाजीपाला मार्केट -शंकर पिंगळे
3) कांदा बटाटा मार्केट -अशोक वाळूंज
4) दाणा मार्केट - निलेश विरा
5) मसाला मार्केट - विजय भूता
कामगार प्रतिनिधी -
शशिकांत शिंदे - बिनविरोध
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai